"ते” 25 रुग्ण शस्त्रक्रियेसाठी सावंगी मेघेसाठी रवाना



प्रमोद क्षिरसागर यांच्या वाढदिवशी झाले होते शिबिर


चंद्रपूर :- भारतीय जनता युवा मोर्चाचे महासचिव प्रमोद क्षीरसागर यांच्या जन्मदिनानिमित्य क्षीरसागर परिवार तर्फे सपना टॉकीज परिसरात 14 डिसेंबरला रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याशिबिरात विविध आजाराच्या रुग्णांची तपासणी करून रोग निदान करण्यात आले. तज्ञ डॉक्टरांनी तपासून करून निदान केल्यावर विविध आजराच्या 25 रुग्णांना आज रविवारी सावंगी मेघे रुग्णालय येथे शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले.
राजकारण असो वा समाजकारण सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे चंद्रपूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर राहुल पावडे यांच्या मार्गदर्शनात हे शिबिर घेण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक छबू वैरागडे शीतल आत्राम, राहुल घोटेकर, रवी गुरनुले, रवी जोगी, सुनील डोंगरे, चांद सय्यद, मनोज पोतराजे, आकाश ठुसे, अक्षय शेंडे, रंजन ठाकूर, संजय पटले, आकाश हटवार, सुमित श्रीराम राजखोडे, अतुल चिंचोलकर, आती शटवार, अमर दुर्गंज, अर्जुन आकाश ठाकूर, कुसुम कडुकर, योगेश गायकवाड, प्रफुल बोदाने यांची उपस्थिती होती. या भव्य आरोग्य शिबिराचा हजारो लोकांनी लाभ घेतला.आर्थिक परिस्थितीमुळे लोकं आजाराकडे दुर्लक्ष करतात. त्याचे गंभीर परिणाम परिवाराला भोगावे लागतात. 25 रुग्ण हे चंद्रपुरातून सावंगीसाठी पाठवले असून हे रुग्ण अनेकांना काही ना काही आजार असल्याने एका विशेष गाडीने या रुग्णांना आज सावंगी मेघे हॉस्पीटल येथे रवाना करण्यात आले.
Post a Comment (0)
Previous Post Next Post