*श्री विठ्ठलाची काकड आरती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते*



*विठ्ठल मंदिर वार्डातील कार्तिक पोर्णिका महोत्सवामध्ये एकोप्याचे दर्शन*


चंद्रपूर:- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाची कृपादृष्टी कायमच महाराष्ट्रवर आहे. गोरगरीब वारकऱ्यांसोबत तो कायमच असतो. त्यांच्या सुख दुखात तो सहभागी असतो. संपूर्ण संत साहित्यांने पंढरपूरच्या विठ्ठलाची किर्ती दुरवर नेली आहे. विठ्ठल मंदिर प्रभागामध्ये प्रत्येक वर्षी कार्तिक पोर्णिमा महोत्सवानिमित्य श्री विठ्ठलाची काकड आरती एकोप्याने बंधूभाव जपून अगदी मनोभावे साजरी करण्यात येते याचा मला अतिशय आनंद होतो, असे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यसाय मंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी असे प्रतिपादन केले.
विठ्ठल मंदिर वार्ड चंद्रपूर येथे ते बोलत होते. यावेळी हनुमान वारकरी मंडळाचे अध्यक्ष  राजेंद्र खांडेकर, भाजपा महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, माजी उपमहापौर राहुल पावडे, हनुमान काकड आरती महोत्सवाचे अध्यक्ष सुधाकर बुटले, कार्याध्यक्ष तुळशीदासजी आंबटकर, माजी नगरसेविका  संगीता खांडेकर, सामाजिक कार्यकर्ते अॅड. सुरेश तालेवार, विनोद शेरकी यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.या वेळी सुधीर मुनगंटीवार यांना कार्तिक पोर्णिका महोत्सवानिमित्य श्री विठ्ठलाची मुर्ती व शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता मंडळाचे उपाध्यक्ष अशोक नवघरे, संतोष वाकुलकर, राहुल पाल, संजय बनकर, नागेश देशमुख, नितीन नवघडे, बंडू जवादे, सावन बोनसुले असंख्य पुरूष महिला यांनी अथक परिश्रम घेतले.
Post a Comment (0)
Previous Post Next Post