चंद्रपूर :- नियमितपणे गेल्या वीस वर्षापासून सातत्याने प्रकाशित होत असलेल्या सा. प्रभातगुंजन च्या ग्रामीण साहित्य विशेषांकांचे प्रकाशन शिक्षणमहर्षी प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , पत्रकार प्रभाकर आवारी यांची उपस्थिती होती. साहित्य विशेषांक संदर्भात प्रभाकर आवारी यांनी प्रथमतः भूमिका मांडली आणि विशेषकांस दर्जेदार साहित्य पाठविलेल्या साहित्य लेखकांचे आभार मानले. याप्रसंगी ग्रामगीताचार्य बोढेकर म्हणाले की, प्रभाकर आवारी यांचे जीवन हे संघर्षाचे एक उदाहरण असून सातत्याने ते आपल्या परीने साहित्य सेवा करीत आहे, हे कार्य अभिनंदनीय आहे . डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले की, साप्ताहिक प्रभात गुंजन नी आपल्या कार्याने वेगळा ठसा ग्रामीण भागातील जनतेवर उमटवला असून त्यातून ग्रामीणांचे प्रश्न सातत्याने मांडले जात आहे ,असे बोलून त्यांनी प्रभाकर आवारी यांचे कौतुक केले. या साहित्य अंकात कवी अरुण झगडकर, रामकृष्ण चनकापुरे ,शितल कर्णेवार, संगीता पिज्दूरकर, अनिल आंबंटकर ,पालीकचंद बिसणे, पवन पाथोडे ,कवी संतोष मेश्राम यांच्या साहित्यांना स्थान देण्यात आले आहे. या अंकासाठी सहसंपादक म्हणून सौ. रेखा प्रभाकर आवारी यांचे विशेष सहकार्य लाभलेले आहे. सूत्रसंचालन आणि आभार राजू कोटकर यांनी केले.

Tags:
चंद्रपूर