चंद्रपूर. सुमन मल्टीपर्पज सोसायटी संचलित किड्स प्लॅनेट पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय संविधान दिन साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशाचे वाचन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे सचिव प्रा. राजेश वेले यांनी विद्यार्थिनींना भारतीय संविधानाचे महत्व सांगितले. शाळेचे अध्यक्ष संजय हांडे, संविधान दिन का साजरा केला जातो. या विषयावर सर्व विद्यार्थिनींना माहिती दिली.संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारल्याच्या स्मरणार्थ संविधान दिन साजरा केला जातो. संविधान हा भारताचा सर्वोच्च दस्तावेज आहे. त्यामुळे ते अत्यंत महत्त्वाचे आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिया गिरडकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका व योगिताजी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रिटा मॅडम यांनी केले तर आभार स्नेहल मॅडम यांनी मानले.

