चंद्रपूर:- महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद तर्फे राष्ट्रीय पत्रकार दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी घेण्यात आलेल्या कार्यशाळा आणि प्रबोधन कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक प्रा. डॉ. इसादास भडके सर होते.कार्यक्रमाचे उदघाटन रिपब्लिकन नेते देशक खोब्रागडे यांनी केले
तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार यशवंतजी दाचेवार, पत्रकार रमजान अली घायल,पत्रकार छुन्नू शेख, पत्रकार निलेश ठाकरे उपस्थित होते. सुरवातीला बालशास्त्री जांभेकर आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला मालर्पण आणि दिप प्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. सदर कार्यक्रमात वक्त्यांनी काल आणि आजची पत्रकारिता आणि पत्रकारची वर्तमान परिस्थिती यावर आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक गोपी मित्रा यांनी, संचालन धनंजय तावाडे यांनी तर आभार पदर्शन डॉ सत्यजित पोद्दार यांनी केले.

