किड्स् प्लॅनेट पब्लिक स्कूलमध्ये बालकदिन उत्साहात*



चंद्रपूर :- सुमन मल्टीपर्पज सोसायटी रनद्वारा संचलित किड्स प्लॅनेट पब्लिक स्कूलमध्ये बालदिन साजरा करण्यात आला.
या विशेष प्रसंगी शाळेचे अध्यक्ष वेले सर यांनी मुलांना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिया गिरडकर यांनी मुलांना बालदिनाचे महत्त्व सांगितले.
चिन्मय उरकुडे आणि जेरेन जोरोंडे यांनी चाचा नेहरूंची वेशभूषा परिधान करून यावेळी भाषण केले. याप्रसंगी, विद्यार्थ्यांना बाल उद्यानात नेऊन बालकदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका व योगिताजी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल मॅडम यांनी केले तर रिटा मॅडम यांनी आभार मानले.
Post a Comment (0)
Previous Post Next Post