चंद्रपूरकरांच्या श्रद्धेचे काम मार्गी लागल्याचा आनंद: सुधीर मुनगंटीवार



चंद्रपूर:- चंद्रपूरचे आराध्‍य दैवत माता महाकाली मंदीर हा आमच्‍यासाठी आस्‍थेचा, श्रध्‍देचा व जिव्‍हाळयाचा विषय आहे. या मंदीर परिसराचा विकास करण्‍यासाठी माझ्या अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात ६० कोटी रू. निधी मी मंजूर करविला. आता या कामाच्‍या निविदेला शासनाची मंजूरी मिळाल्‍यामुळे या मंदीर परिसराच्‍या विकासकार्याला लवकरच प्रारंभ होणार आहे. तमाम चंद्रपूरकरांच्‍या श्रध्‍देशी निगडीत हा विषय मार्गी लागणार असल्‍याने विलक्षण समाधान मी अनुभवत आहे, असे भावपूर्ण प्रतिपादन राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य तसेच मत्‍स्‍यव्‍यवाय तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.


दिनांक १४ नोव्‍हेंबर रोजी चंद्रपूर शहरातील महाकाली मंदीर परिसरात भाजपातर्फे आयोजित महाआरती कार्यक्रमाच्‍या निमीत्‍ताने श्री. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्‍हणाले, श्री महाकाली मंदीराशेजारील दुसरे श्रध्‍दास्‍थान श्री अंचलेश्‍वर मंदीराचा विकास केंद्र सरकारच्‍या प्रसादम योजनेच्‍या माध्‍यमातुन आपण करणार आहोत. लोकप्रतिनिधी म्‍हणून श्री महाकाली मंदीर परिसराचा विकास, श्री अंचलेश्‍वर मंदीर परिसराचा विकास करणे हे आपले पुर्वीपासुनचे स्‍वप्‍न आहे. आता हे स्‍वप्‍न मुर्तरूप घेत आहे याचा विशेष आनंद आहे. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी श्री गंगानदी तटावर रिव्‍हर फ्रंट विकास कार्य ज्‍या पध्‍दतीने केले आहे त्‍याच धर्तीवर आपण गोदावरी नदी तटावर रिव्‍हर फ्रंट विकास करणार आहोत. हीच प्रक्रिया चंद्रपूरातील झरपट नदी तटावर सुध्‍दा करण्‍याच्‍या दृष्‍टीने आपण प्रयत्‍नशील आहोत, असेही श्री. सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.


श्री महाकाली मंदीर परिसराच्‍या विकासासाठी ६० कोटी रू. निधी मंजूर झाला व या कामाच्‍या निविदेला शासनाची मंजूरी मिळाल्‍याबद्दल भाजपा चंद्रपूर महानगर शाखेतर्फे आनंदोत्‍सव साजरा करण्‍यात आला व श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते महाआरती देखील करण्‍यात आली. यावेळी विविध धार्मीक संघटना, मंदीर परिसरातील दुकानधारक, विविध क्रिडा मंडळे, गणेश मंडळे, डिजे संघटना तसेच विविध सामाजिक संघटनांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांचा सत्‍कार केला.


यावेळी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, प्रमोद कडू, माजी उपमहापौर राहूल पावडेमहिला आघाडीच्‍या महानगर महामंत्री ब्रिजभूषण पाझारेभाजयुमो महानगर अध्‍यक्ष विशाल निंबाळकरसंदीप आगलावेप्रज्‍वलंत कडूसौ. छबू वैरागडेसचिन कोतपल्‍लीवाररवि लोणकरचंद्रकला सोयाममंदिराचे विश्‍वस्‍त सुनिल महाकालेसौ. आशा महाकालेमनोहर टहलियानीरवि आसवानीसौ. रेणु घोडेस्‍वाररवि जोगीसौ. कल्‍पना बगुलकरसौ. सविता कांबळेसौ. शिला चव्‍हाणसोपान वायकरप्रदिप किरमेशाम कनकमसतिश उर्फ मन्‍ना महाराजमाया उईकेअरूण तिखेसुनिल डोंगरेप्रमोद क्षिरसागरराजकुमार पाठक, मनोज पोतराजेधम्‍मप्रकाश भस्‍मेरूद्रनारायण तिवारीरोडमल गहलोतसुरेश तालेवारप्रमोद शास्‍त्रकारसुर्यकांत कुचनवारचंदन पालराजेंद्र खांडेकरमोनीशा महातवआशिष ताजनेचंदन पालसुशांत आक्‍केवारसुशांत शर्मासंजय निखारेमहेश राऊतअमित गौरकारअमोल मत्‍तेनूतन मेश्रामकविता जाधवसुर्या खजांचीसिंधु राजगुरेसारीका सुंदरकरप्रभा गुडधेचांद सय्यदराजेश यादवज्ञानचंद तैलानीतेजा सिंगगणेश रामगुंडावारपप्‍पु बोपचेसुरेश हरीरामानीसुजिता मुरस्‍कररंजीता येलेदेवतळे ताईमुग्‍धा खाडेगणेश रासपायलेमहेश कोलावारअक्षय शेंडेरंजना उमाटेक्षिरसागर ताईअमोल नगराळे आदींची उपस्थिती होती.


Post a Comment (0)
Previous Post Next Post