जिल्हाधिकारी साहेब..!जनतेचा अंत पाहू नका: राहुल पावडे



धार्मिक स्थळ परिसरात मद्य दुकांनाना परवानगी देण्याची गरज काय?

देशी दारु भट्टी व बिअर शॉपी बंद न झाल्यास जनता रस्त्यावर उतरणार

चंद्रपूर :-पावनभूमी व श्रद्धास्थान असलेल्या जगन्नाथ बाबा मठ परिसरातील देशी दारु व बिअर शॉपचे दुकान रद्द करावे, या प्रमुख मागणीसाठी जगन्नाथ बाबा नगर संयुक्त दारुबंदी समितीच्या माध्यमातून मागील महिनाभरापासून विविध प्रकारचे आंदोलन सुरू आहे. कारवाई होत असल्याचे सांगत जात आहे परंतु त्याबद्दल कोणताही निर्णय होत नसल्यामुळे जनता संतप्त झाली आह.त्यामुळे जिल्हाधिकारी साहेब..जनतेचा अंत बघू नका.धार्मिकस्थळ परिसरात दारू दुकानांना परवानगी देण्याची गरज काय..?असा सवाल माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी उपस्थित केला आहे.

 जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभाग या दुकानांबाबत कोणतीही कारवाई करत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे, दरम्यान बंद केलेली बियर शॉपी पुन्हा उघडल्याने येथील लोकांमध्ये रोषाचे वातावरण असून "हे चंद्रपूर आहे की मद्यपुर" असा सवाल माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी उपस्थित केला असून, येत्या काही दिवसात प्रशासनाने कारवाई न केल्यास जनताच रस्त्यावर उतरून जनआंदोलन करणार, असा गर्भित इशारा राहुल पावडे यांनी दिला आहे.
 जिल्हाधिकाऱ्यांना स्मरणपत्र देण्यात आले. यात हजारोच्या संख्येने महिलांचा सहभाग होता. जिल्हाधिकारी यांना घेराव घालून शेकडो लोकांनी या दारू दुकानाला विरोध केला. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरीता जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली होती. परंतु, महाविकास आघाडी सरकारने दारुबंदी उठवून जिल्ह्यात अराजकतेचे वातावरण निर्माण केले आहे. जगन्नाथ बाबा नगरातील देशी दारू व बिअर शॉपी दुकाने रद्द करावी, यासाठी नागरिकांनी एल्गार पुकारला. नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदने  देवून जनमत चाचणी, विद्यार्थ्यांकडून पोस्टकार्ड, व लक्षवेधी आंदोलनाच्या श्रृंखला चालवून प्रशासनाचे लक्ष वेधले. परंतु, जिल्हा प्रशासन या प्रकरणीे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांचा संताप वाढत चालला आहे. पुढे चालून येथे जनप्रक्षोभ भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या दृष्टीकोनातून या परिसरातील देशी दारु दुकान व बिअर शॉपी तातडीने बंद करावी, यासाठी जगन्नाथ बाबानगर संयुक्त दारुबंदी  समितीच्या नेतृत्वात माजी उपमहापौर राहुल पावडे व नागरिकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी व दारूबंदी विभागास स्मरणपत्र देण्यात आले, प्रशासनाने जनतेचा अंत बघू नये.
गेल्या सात ते आठ दिवसापासून जनता प्रतिक्षेत आहे. जो अहवाल सादर केला होता तो, पॉझिटिव्ह आहे, असे दारूबंदी अधीक्षक यांनी सांगितले. जिल्हाधिकारी यांनी सुद्धा यावर आम्ही ठोस निर्णय घेऊ, असे सांगितल. मात्र निर्णय झालेला नाही. तेव्हा किती काळ जनतेने प्रतीक्षा करावी, आता डोक्यावरून पाणी गेले आहे, तेव्हा जिल्हाधिकारी यांनी संतप्त चंद्रपूरकरांच्या भावना लक्षत घेऊन सकारात्मक निर्णय दयावा व उत्पादन शुल्क विभागातील भ्रष्टाचाराला लगाम घालावा, अशी नागर्वासियाची विनंती आहे.
सदर दारू दुकान स्थलांतरित न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राहुल पावडे यांनी दिला आहे. दारुशक्ती विरोधात लोकशक्ती एकवटण्याचे आवाहन राहुल पावडे यांनी केले आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post