चंद्रपूर :- जिल्हयात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून जुगार, मटका, अंमली पदार्थ, कोंबड बाजार, चोरी ह्यासारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी दिवसाढवळ्या सुद्धा उभ्या दुचाकी चोरण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून ह्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे ह्यांनी व्यूहरचना आखून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना सुचना दिल्या.जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथक तयार करून वाहन चोरी रोखणे व वाहन चोरांना जेरबंद करण्याच्या उद्देशाने विशेष मोहिम राबविली दरम्यान प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करून प्रदीप संजय शेरकर वय 24 वर्षे रा. पारधी गुडा घेपटाळा ता. कोरपना जि. चंद्रपूर, विजय शंकर देवगडे वय 30 वर्षे रा. पारधीगुडा, खैरगाव, राजेंद्र नानाजी काळे वय 29 वर्षे रा. पारधीगुडा, लक्कडकोट ता. राजुरा जि. चंद्रपूर, रोषन अशोक गोबाडे वय 27 वर्ष रा.देलनवाडी ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर व विपुल प्रभाकर मैश्राम वय 24 वर्षे रा. सायमारा ता. सावली जि. चंद्रपूर ह्या पाच वाहन चोरांना ताब्यत चेवून त्यांचेकडून पो.स्टे. वरोरा, पो.स्टे. रामनगर, पो.स्टे. राजूरा, पो.स्टे.गडचांदूर यवतमाळ जिल्हयातील पो.स्टे. वणी येथील गुन्हयातील एकूण 15 मोटार सायकली हस्तगत केल्या.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अरवींद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेब खाडे पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात स्था.गु शाचे स.पो.नि. मंगेश भोयर, पोउपनि अतुल कावळे, सफीराजेंद्र खनके, पो. हवा. स्थानीदास चालेकर, संजय आतंकुलवार, सुरेंद्र मोहंतो. ना. पो. को चंद्रकांत नागरे, मिलींद चव्हाण, जमीर पठाण, नितेश महात्मे, अनुप डांगे, संतोष येलपुलवार, गोपाल आतकुलवार, म्युर येरणे, प्रसाद धुलगडे, प्रमोद कोटनाके, गणेश भोयर, गणेश मोहुर्ले, संदीप मुळे प्रशांत नागोसे, रविंद्र पंधरे, प्रांजल झिलपे, कुंदनसिंग बावरी, गोपीनाथ नरोटे, संजय वाढई, दिपक डोंगरे, चालक पो.हवा. प्रमोद डंबारे यांनी केली असुन आरोपी व जप्त मोटार सायकल संबंधीत पो. स्टेच्या सुपूर्द करण्यात आले असून पुढील तपास सबंधीत पो. स्टे करीत आहे.
