पडोली येथील एका व्यक्तीचे विहिरीत प्रेत आढळले



चंद्रपूर :- पडोली येथील एका तरूणाला काही तरूणांनी बेदम मारहाण केली. मारहाण करणारे ऐवढ्यावरच थांबले नाहीत तर त्या तरूणाचे हातपाय दोरीने बांधले अन पाठीवर मोठा दगड बांधून त्याला विहीरीत फेकून दिले. यात त्याचा दुदैवी मृत्यू झाला.ही घटना जिल्ह्यातील मोरवा येथे घडली. प्रविण घिवे असे मृतकाचे नाव आहे. घटनेची माहीती मिळताच पोलीसांनी घटनास्थळ गाठून विहीरीतील मृतदेह पोलीस रेस्क्यू पथकाच्या साहाय्याने बाहेर काढल्याची माहीती आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.



पडोली पोलीस स्टेशन हद्दीतील आज सकाळच्या सुमारास एका व्यक्तीचे प्रेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे  पोलिसांनी या  प्रकरणाची नोंद घेतली आहे
Post a Comment (0)
Previous Post Next Post