पर्यावरण सप्ताह निमित्ताने गडचिरोली येथे सायकल रॅली संपन्न...




गडचिरोली -:  सायकल स्नेही मंडळाचे वतीने  पर्यावरण सप्ताह   च्या निमित्ताने विशेष रॅली काढण्यात आली. इंदिरा गांधी चौक ते कठाणी नदीमार्गाकडे काढण्यात आलेल्या या रॅलीत मंडळाचे प्रेरक  ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, कार्याध्यक्ष ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ प्रा.  विलास पारखी  , विलासराव निंबोरकर , प्रमोद राऊत,  उपेंद्र रोहणकर , बाल सायकल स्नेही ओंकार धकाते , आदी युवा वर्ग सहभागी झाले होते. गेल्या चार वर्षापासून  नागपूर मार्गावर मंडळाचा जनजागृती फलक लावण्यात आलेला आहे  . त्या फलकाचे सौंदर्यीकरण याप्रसंगी करण्यात आले . त्यानंतर परिश्रम भवनमध्ये झालेल्या विशेष सभेत वार्षिक वर्धापन दिवस आयोजित करण्याबाबत  सविस्तर चर्चा करण्यात आली. येणाऱ्या  वर्धापन दिन कार्यक्रमात सायकल  स्नेही पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले. सूत्रसंचालन विलास निंबोरकर यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. विलास पारखी यांनी केले तर उपेंद्र रोहणकर यांनी आभार मानले . सायकल  मंडळाची दर बुधवारी सायकल रॅली काढण्यात येत असते. त्याबरोबरच पर्यावरण, आरोग्य, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी सदर मंडळ गेल्या चार वर्षांपासून सातत्याने   कार्यरत आहे, हे विशेष.
Post a Comment (0)
Previous Post Next Post