दोन दिवसीय खुली राष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन



चंद्रपूर :- चंद्रपूर येथे 28 व 29 ला दोन दिवसीय खुली राष्ट्रीय कराटे स्पर्धा- 2022 चे आयोजन संपूर्ण भारतातून स्पर्धकांचा राहील सहभाग चंद्रपूर शनिवार दिनांक 28 व रविवार दि. 29 मे रोजी चंद्रपूर महानगरपालिका पटांगण गांधी चौक चंद्रपूर येथे अठरावी राष्ट्रीय ज्युडो कराटे क्रीडा स्पर्धा-२०२२ चे आयोजन करण्यात आले असून मागील 18 वर्षापासून सून खुल्या जुडो कराटे स्पर्धेचे आयोजन चंद्रपूर बॉक्सिंग स्पोर्ट्स अकादमी, राष्ट्रीय वन पर्यावरण संरक्षण समिती चंद्रपूर तथा महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केल्या जात असते. क्रीडा स्पर्धेत संपूर्ण भारतातून हजारोच्या संख्येने हिस्सा घेत असतात. यावर्षी पहिल्यांदाच चंद्रपूर चे लोकप्रिय आमदार किशोर जोरगेवार यांच्या सहयोगाने ही ज्युडो-कराटे स्पर्धा आमदार चषक स्पर्धा म्हणून आयोजित होणार आहे. शनिवार २८ रोजी होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमास कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रधान आमदार विजय वडेट्टीवार हे लाभले असून कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष क्रीडा राज्यमंत्री सुनील केदार हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून चंद्रपूर जिल्हयाचे लोकप्रिय खासदार बाळु भाऊ धानोरकर, वरोऱ्याच्या आमदार सौ. प्रतिभाताई धानोरकर, राजुरा चे आमदार सुभाष धोटे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड तर प्रमुख अतिथी म्हणून ओबीसी नेते अशोक जीवतोडे, संतोष रावत, बाबासाहेब वासाडे, दीपक जयस्वाल व कुमारी शिवानी विजय वड्डेट्टीवार यांची उपस्थिती राहणार आहे. वार दिनांक 29 रोजी सायंकाळी पाच वाजता बक्षीस वितरण सोहळा च्या कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, सोहळा प्रमुख आम. सुधीर मुनगंटीवार, वितरण सोहळा मार्गदर्शक आम. किशोर जोरगेवार यांची उपस्थिती राहणार आहे तर विशेष अतिथी म्हणून चिमूर चे आमदार बंटी भांगडिया मनपाचे आयुक्त राजेश मोहिते मनपाचे माजी उपमहापौर राहुल पावडे प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड, जिल्हा अन्नपुरवठा अधिकारी शालिग्राम भराडी, प्रदूषण विभागाचे अशोक करे, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, डॉक्टर अमोल पोद्दार, सेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, रायुकां जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख जयदीप रोडे यांची उपस्थिती राहणार आहे. या अठराव्या खुल्या राष्ट्रीय जुडो कराटे स्पर्धा-२०२२ जास्तीत जास्त नागरिकांनी चंद्रपूर शहर महानगरपालिका पटांगण गांधी चौक चंद्रपूर येथे उपस्थित राहावे असे आवाहन चंद्रपूर जिल्हा स्पोर्ट्स अकादमी चंद्रपूर वन पर्यावरण संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघाचे सोमेश्वर येलचलवार, ज्योती माणूसमारे व मोनी आसवानी यांनी केले आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post