जुने लायसन्स नव्याने सुरू करताना कागदोपत्री तफावत प्रकरण
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्याची दारू सुरू होताच शहरासह जिल्ह्यात शेकडो दारुची दुकाने थाटली जात आहे. काही जुने परवाने नुतनीकरण करून तर काही नवीन परवाने दिले जात आहे. मात्र, एका देशी दारु दुकानाच्या प्रकरणात परवाना देतांना जुन्याच व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याचे दिसून येते. देशी दुकानाचे जुने लायसन्स हे नव्याने सुरू केले असता त्यामध्ये काही तफावत आढळून येत आहे. असे असताना त्या देशी दारू दुकानावर कोणतीच कारवाई केलेली नसल्याचे आढळून आले आहे दारु दुकान सुरू केले आहे. यासंदर्भात आमच्या प्रतिनिधीने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्याकडे विचारणा केली असता चार दिवसांत त्या देशी दारू दुकानावर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे चार दिवसांत कारवाई होणार का? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.जिल्ह्यात दारुबंदी उठल्यानंतर गल्ली बोळात दारुचे परवाने देण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. परंतु, सदर परवाने देतांना योग्य कागदपत्रांची पूर्तता होणे आवश्यक असते. परंतु, तसेच न होता जुने लायसन्स नव्याने सुरू करताना त्यात आवश्यक कागदपत्रांमध्ये तफावत दिसून येत आहे. आत्तापर्यंत तफावत आढळून आलेल्या सदर देशी दारु भट्टीवर कोणतेही कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे त्या देशी दारू भट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आशीर्वाद आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र आता आमच्या प्रतिनिधीने राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील यांची भेट घेऊन याबाबत विचारले असता, संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी आपल्या दालनात बोलवून सदर प्रकरण हे काय आहे, असा प्रश्न करून आणि पंधरा दिवसांमध्ये आवश्यक कागदपत्र देण्याचे स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेले असतांनात आत्तापर्यंत का दिले नाही, असे ठणकावून विचारणा केली. चार ते पाच दिवसात सादर लेटर देण्यात यावे, असेही सांगितले. चार ते पाच दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
