चंद्रपूर :- मासोळी पकडण्यासाठी गेलेल्या एक पुरुष आणि एक चिमुकल्याला माजरी नदीघाटावर वर्धा नदीच्या जलसमाधी मिळाली आहे ही घटना आज 14 मे रोजी दुपारच्या सुमारास घडली.
पाच ते सहा लोक आज माजरी नदीघाटावर गेले होते मासोळी पकडण्याचा त्यांचा प्लॅन होता
मासोळी पकडत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही हॉल डोहात बुडून मरण पावले बुडत असताना आजूबाजूच्या सहकाऱ्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला अशोक रामपाल यादव 42 आणि रोहित राहुल मलय 8 अशी मृतकांची नावे आहेत घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींनी माजरी पोलिसांना माहिती दिली माहितीच्या आधारे माजरी पोलीस घटनास्थळी दाखल झाली या घटनेची माहिती पथकाला देण्यात आली रेस्क्यू पथक यांनी बोटीच्या माध्यमातून मृतदेहांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजता दोन्ही मृतदेह पाण्या बाहेर काढण्यात आले माजरी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह वरोरा उपजिल्हा रुग्णालयात पाठवले या घटनेचा पुढील तपास माजरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विनोद घागे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे

