चंद्रपूर :- देशभरातील कोळशाचे संकट आणि जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे विजेची मागणी सातत्याने वाढत आहे. गेल्या 20 दिवसांपासून लोडशेडिंग करण्यात आलेले नाही. मात्र चंद्रपूरच्या काही भागात विजेचा लपंडाव सुरू आहे.
आज शनिवारी दोनदा तर शुक्रवारी तीन ते चार वेळा वीजपुरवठा खंडित झाल्याने लोक उकाड्यामुळे हैराण झाले. कोळसा संकट असतानाही महावितरणने लोडशेडिंग केलेले नाही. कृषी पंपांना दिवसा व रात्री 24 तास वीजपुरवठा केला जात आहे. उन्हाळा सुरू झाल्याने मार्च महिन्यापासून विजेची मागणी वाढली आहे. महावितरणने योग्य नियोजन करून विजेच्या मागणीकडे विशेष लक्ष दिले असून, त्या तुलनेत विविध स्त्रोतांकडून मिळणाऱ्या विजेकडे विशेष लक्ष दिले आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून शहरातील काही भागात वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामावर याचा परिणाम होत आहे.
