सिलिंडरच्या स्फोटात जखमी झालेल्या कामगाराच्या परिवाराला उलगुलान कामगार संघटनेची मदत



प्रयत्न करूनही कामगार व त्याच्या पत्नीचा जीव वाचवू शकलो नाही याबाबत दुःख:- राजु झोडे

घुगुस:- घुगुस शहराला लागून असलेल्या नकोडा गावातील कोळसा खदान येथील कामगार  अरवली आसम आपल्या परीवारासोबत राहत्या घरी असताना अचानक सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. परिवारातील पत्नी मुलगा व मुलगी चारही जन यामध्ये गंभीररित्या जखमी झाले. तात्काळ उलगुलान संघटनेच्या कामगारांनी जखमींना चंद्रपूर येथे हलविले. सदर घटना ही २९ एप्रिलला घडली व दोन ते तीन दिवसाच्या कालावधीत पती व पत्नी दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.कामगार हा उलगुलान कामगार संघटनेचा सदस्य होता. दवाखान्यात उपचार करत असताना उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे यांच्या मार्गदर्शनात संघटनेच्या कामगारांनी संघटनेच्या माध्यमातून निधी गोळा करून जवळपास एक लाख रुपयाची मदत केली होती. परंतु हा अपघात एवढा भीषण होता की, त्यामध्ये कामगार व त्याच्या पत्नीला नागपूरला हलवुनही जीव वाचवू शकता आला नाही. कामगाराच्या मुलाची प्रकृती अजूनही गंभीर असून संघटनेचे पदाधिकारी व सदस्य सर्वस्तरावर  मदत करीत आहेत. कामगाराचा जीव वाचवण्याकरिता आर्थिक मदत करूनही व इतर प्रयत्न करूनही कामगाराचा व त्याच्या पत्नीचा जीव वाचवू शकता आला नाही याबाबत संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी हळहळ व दुःख व्यक्त केले. कामगाराचा जीव वाचविण्याकरिता संघटनेचे पदाधिकारी अमित कुंभारे हंसराज लांडगे. यांनी अतोनात प्रयत्न केले. संघटना अरवली आसम या कामगाराच्या परिवाराच्या दुःखात सोबत आहे व सोबत राहणार असे संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे मोन्टी ,नुरभाई, अमिंत कुंबारे, हनिफ,हंसराज लाडगे,निशित सोदारी,मोगली लगा,अजय रोहिदास यांनी आपले दुखत मत व्यक्त केले.
Post a Comment (0)
Previous Post Next Post