उपमहापौर राहुल पावडे यांनी जगन्नाथ बाबा नगरातील सुरू झालेले देशी दारू भट्टी काही क्षणातच आणखी नागरिकांच्या समावेशयात पाडली बंद*



चंद्रपूर :- जगन्नाथ बाबा मठाजवळ या परिसरात दारुचे दुकान उघडण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी येथील नागरिकांनी या दुकानाला प्रचंड विरोध करून दारु दुकान बंद पाडले. मात्र, नागरिकांचा विरोध झुगारून पुन्हा आज शुक्रवारी या परिसरात दारु दुकान सुरू करण्यात आले याची माहिती जगन्नाथ बाबा नगर संघर्ष समितीला मिळाल्यानंतर काही क्षणातच ही दारू भट्टी बंद पाडण्यात आली होती या दारू भट्टी ला येथून स्थलांतरित होण्याकरिता यासाठी मागील 10 ते 15 दिवसांपासून एल्गार आंदोलन सुरू केले आहे.

 उपमहापौर राहुल पावडे यांनी जगन्नाथ बाबा नगरातील सुरु झालेली देशी दारू भट्टी काही क्षणातच आणखी नागरिकांच्या समावेशयात बंद पाडली आहे याविरोधात नागरिक मैदानात उतरले आहे. मात्र, नागरिकांचा विरोध झुगारून आज दारु दुकान सुरू करण्यात आल्याने नागरिकांमधून मोठा संताप या ठिकाणी पाहायला मिळाला होता सुरु झालेली दुकान मात्र उपमहापौर राहुल पावडे यांच्या समावेशयात समस्त जगन्नाथ बाबा नगरातील लोकांनी सुरु झालेली देशी दारू भट्टी हे काही क्षणातच बंद केले होते यावेळी ज्या ठिकाणी देशी दारू सुरू करण्यात आली त्या ठिकाणी मोठ्याप्रमाणात पोलिसांना पाचारण करण्यात आले होते तसेच दारूबंदी विभागाची टीम सुद्धा या परिसरात आल्याने नागरिकांनी आपल्या समस्या दारूबंदी विभाग यांच्याकडे सांगण्यात आले व येथील दारू भट्टी लवकरात लवकर स्थलांतर करावी या दारु दुकानाची परवानगी लवकरात लवकर रद्द करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post