विरुद्ध दिशेने येणा-या ट्रकने दोघांना उडविले



राजुरा :- राजुरा तालुक्यातील सोनुर्ली निवासी आकाश ढोले व नागेश आदे हे दोघेही गावाकडे परतत असताना विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक चालकाने दुचाकीस्वरांना जोरदार धडक दिली. यात आकाश ढोले याचा जागीच मृत्यू झाला. तर नागेश आदे हा गंभीररित्या जखमी झाला आहे. ही घटना आज 17 एप्रिल रोजी सकाळी 9वाजताच्या सुमारास सोंडो सोनुर्ली मार्गावर घडली.आज सकाळी मृतक आकाश ढोले व नागेश आदे हे दोघेही दुचाकीवर बसून देवाडा गावात काहीं कामानिमीत्त आले होते. आपले काम आपटून ते दोघेही आपल्या स्वगावी सोनुर्ली गावाकडे परत जात होते. दरम्यान राजुरा असिफाबाद राष्ट्रीय महामार्गावर सोंडो गाव जवळील पुलासमोर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या धडकेत आकाश मारोती ढोले (16) रा. सोनुर्ली याचा जागीच मृत्यू झाला. तर नागेश मोहन आदे (28) रा. सोनुर्ली याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर ट्रक एमएच 34 एव्ही 6186 चा चालक पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र नागेश याने सिनेस्टाईल ट्रकवर चढून त्याला थांबवून थेट राजुरा पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेची माहिती मिळताच विरूर स्टेशन पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी राजुरा उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते.
Post a Comment (0)
Previous Post Next Post