भिवापूर येथील साई मंदिरात वर्धापनदिन उत्सव आजपासून*



चंद्रपूर : येथील भिवापूर वार्डातील साई मंदिरात पाचवा वर्धापन दिन आणि कळस स्थापना उत्सवाचे आयोजन १८ आणि १९ एप्रिल रोजी करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी ६.३० वाजता मूर्तीला मंगल स्नान, अभिषेक पूजा व आरती होईल, ८ वाजता २१ कुण्डीय हवन, दुपारी १२ वाजता मध्यान्ह आरती, दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत भजन महोत्सव होणार आहे. सायंकाळी ६ वाजता पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.चंद्रपूरमंगळवारी सकाळी ५.३० वाजता कळसाची विधीवत पूजा व स्थापना करण्यात येणार आहे. सकाळी ८.३० वाजता साईचरित्र पोथीचे सामूहिक वाचन होणार आहे. दिवसभर विविध कार्यक्रम होणार असून, रात्री ७ ते १० वाजेपर्यंत महाप्रसाद वितरण होणार आहे. येथील कार्यक्रमाला खासदार बाळू धानोरकर, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर, माजी खासदार तथा ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. दोन दिवसीय कार्यक्रमात आणि पालखीत साई भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन साईबाबा मंदिर महोत्सव समितीचे मुख्य समन्वयक अशोक कोटकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post