अचानक आग लागल्याने पुढील अनर्थ टळला




ब्रह्मपुरी:- तालुक्यातील बोडधा (कुडेसावली) गावालगत असलेल्या जंगलाला अचानक आग लागली. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला.अचानक आग लागल्याने ती गावापर्यंत पोहोचण्याची शक्यता होती. यामुळे गावकरी घाबरले होते. गावक-यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीच्या ज्वाळा झपाट्याने या परिसराला आपल्या कवेत घेत होत्या. गावकऱ्याकडून वेळीच दखल घेत याची माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते विनोद झोडगे यांना दिली. त्यानी लगेच अग्निशामक दलाला घटनास्थळी पाचारण केले. यानंतर आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. व आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून जंगलातील झाडे देखील वाळली आहे. त्यामुळे आग झपाट्याने पसरते. ही आग नेमकी कशाने लागली याचे कारण मात्र कळू शकले नाही. वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला.
Post a Comment (0)
Previous Post Next Post