रणरागिनी हिरकणी फाउंडेशनच्या वतीने एकदिवसीय मार्गदर्शन शिबीर संपन्न


हिरकणीतर्फे पालक मातांना मार्गदर्शन

बल्लारपूर : जीवनात यशस्वी होण्यासाठी नेहमी सकारात्मक विचार बाळगणे आवश्यक ठरते. तीच बाब पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात दर्शवावी, त्याकरिता काय केले पाहिजे, उपाययोजना कोणत्या, याविषयी माता पालकांना मार्गदर्शन करण्याकरिता येथील रणरागिणी हिरकणी फाउंडेशनच्या वतीने एकदिवसीय मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका रुबीना शेख तसेच गुरुनानक पब्लिक स्कूलच्या प्राचार्य रुहाना शेख यांनी याबाबत अनेक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी हिरकणीच्या संस्थापिका नेहा भाटिया होत्या. सरोज बद्दलवार, माधवी गुंडेटी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक आरती मानेपल्ली, संचालन श्रद्धा शेंडे यांनी केले व आभार रेखा देशकर यांनी मानले. सुनीता वाघमारे, श्रीवास्तव, मीना थूल आदींची उपस्थिती होती.
Post a Comment (0)
Previous Post Next Post