आणि बाबा मोगरे झाला सत्कार


आजाद बगीच्यातील लोकार्पण समारोहात झालेल्या 'चर्चित' कार्यक्रमात एक सुखावणारी घटना घडली. बगिच्यात रोज फेरफटका मारायला येणाऱ्या प्रत्येकाची भेट होते ती,बाबा बाबुराव मोगरे या अवलिया माणसाशी. बाबा मोगरे चे नाव बगिच्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहीत असेल असे नाही, पण त्याचा चेहरा हा सर्वांचा परिचित. बगिच्यात दाखल होताच कधी झाडाला पाणी देतांना तर कधी मोकाट कुत्र्यांना बाहेर हाकलून देतांना व कधी बगिच्यात उपद्रव करण्याऱ्या उडान टप्पू लोकांनां खडसावताना.  शनिवारी झालेल्या कार्यक्रमात बगीच्यातील जेष्ठ नागरिक, हास्य क्लब, झुमबा क्लब, सूर्य नमस्कार समूह सोबतच अन्य थोरा- मोठयचं सन्मान- सत्कार झाला.  शेवटी जेव्हा आमदार सुधीर मुनगंटीवार, महापौर राखी कंचर्लावार अन्य मान्यवर मंच खाली उतरून जात होते त्यावेळी बगिच्यात नियमित येणाऱ्या   नागरीकांनी आ.मुनगंटीवार यांना आजाद बगीच्यातील मनपा चे चौकीदार बाबा बाबुराव मोगरे यांचा सत्कार करण्याची विनंती केली.  त्यांनी पण विनंती ला मान  देत बाबा मोगरे चा सत्कार करण्यास होकार दिला.  मंचावरून बाबा मोगरे चे नाव पुकारण्यात आले, बाबा आपल्या नियमित कामात व्यस्त होते.त्यास शोधून आणल्या गेले, भकास झालेली बाग पुन्हा टवटवीत झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता, त्यात मान्यवरांच्या हस्ते त्याचा अनपेक्षितपणे होत असलेल्या सत्कार बघून  बाबाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळुन गेले.
अनेकानेक वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या लोकार्पण कार्यक्रम चा शेवट चंद्रपूर शहराशी- आजाद बगीच्याशी निर्लोभ प्रेम करणाऱ्या नागरिकांच्या पुढाकाराने बाबा मोगरेच्या आनंदाश्रू ने सिंचन करीत संपन्न झाला.
Post a Comment (0)
Previous Post Next Post