पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री. चैतराम पवार याच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन

भामरागड:- येथील राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख तथा निर्सग अभ्यासक फॉउडेशनचे अध्यक्ष डॉ. कैलास वि. निखाडे यांच्या पाणी व्यवस्थापन या पुस्तकाचे प्रकाशन विदर्भ पाणी परिषदमध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री. चैतराम पवार यांच्या हस्ते पार पडले. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या अभ्याक्रमानुसार सदर पुस्तकाची रचना करण्यात आली असून पाणी व्यवस्थापनाच्या सर्व पध्दतीवर भर देण्यात आलेला आहे. पाणी अडवा पाणी जिरवा हा संदेश या पुस्तकांच्या माध्यमातुन देण्यात आलेला आहे. पुस्तक प्रकाशनाप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सन्माननीय कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, प्रकुलगुरु डॉ. सुभाष कोंडावार,  डॉ. समय बनसोड मा. राज्यपाल नामित व्यवस्थापन परिषद सदस्य रा.तु.म.ना.वि. नागपूर  संयोजन समितीतील डॉ. विजय इलोरकर, सौ. शुभांगी नक्षिणे उंबरकर, श्री. राज मदनकर, श्री. सुमंत पुणतांबेकर, श्री. सोपानदेव पिसे, आमचे मित्र मा. वामनराव तुर्के  उपस्थित होते.
Post a Comment (0)
Previous Post Next Post