चंद्रपूर :- भाजप महानगर तर्फे लोकमान्य टिळक विद्यालय चंद्रपूर येथे महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व राहुल पावडे,जिल्हाध्यक्ष भाजप महानगर यांच्या नेतृत्वात क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त समाजाच्या वतीने काढण्यातआलेल्या शोभायात्रेचे स्वागत यावेळी करण्यात आले शोभायात्रेमध्ये समाज बांधवांना फ्रुटी वाटप करण्यात आले समाजाच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक लोकमान्य विद्यालय जवळ येताच चंद्रपूर भाजप महानगर तर्फे मिरवणुकीत सहभागी समाज बांधवांना फ्रुटी वाटप करण्यात आले सदर शोभायात्रेमध्ये समाजाचे अध्यक्ष राजू बनकर व विजय चहारे, कार्तिक वानखेडे, आशुतोष वानखेडे, सागर वानखेडे, शैलेश इंगोले, अरुण तिखे, इत्यादी समाज बांधवाचे शाल श्रीफळ देऊन राहुल पावडे , जिल्हाध्यक्ष भाजप महानगर यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले होते. सदर शोभायात्रा गांधी चौक मार्गक्रमान करी गिरणार चौक ते बालाजी वार्ड समाज भवन येथे समापन करण्यात आले यावेळी राहुल पावडे, जिल्हाध्यक्ष भाजपा महानगर महिला मोर्चा अध्यक्ष सविता कांबळे बाजार मंडळाचे अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार रवि लोनकर,रवि गुरूनूले,सौ.सगिता खांडेकर, जयश्री जुमडे, राजेंद्र खांडेकर, बाळू कोलणकर,बी.बी सिंग,महेंद्र जुमडे, कविता जाधव, सुवर्णा लोखंडे, मधुकर राऊत,मोनिशा महातव, तुषार मोहुले,सत्यम गाणार,सचिन बोबडे , अमोल मते,पराग मलोडे,शुभम गेडाम, कार्यकर्ते व भाजप महानगर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.