ग्रामपंचायत निधीचा असाही गैरवापर
चंद्रपूर:- मित्र म्हणजे एक अतूट नातं आपल्या या समाजामध्ये मानल्या जातात मित्र म्हणजे सर्व काही, मित्र म्हणजे सर्व असंच एक उदाहरण चंद्रपूर येथून काही किलोमीटर असलेल्या एका ग्रामपंचायतीने दाखवून दिले आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सदर व्यक्ती हा सदस्य म्हणून निवडून आलेला आहे. मात्र आपल्याच एका मित्राला चक्क त्याच्या शेतामध्ये नाली बांधून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायत च्या निधी हा एका शेतामध्ये ठेवी एका व्यक्तीच्या नावाने असलेल्या स्वतःच्या मालकीच्या जागेवर ग्रामपंचायतीचा निधीचा वापर अशा प्रकारे केल्याचा दिसून आल्याने याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांनी याबद्दलची तक्रार त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा पाठवली आहे. मात्र त्या ग्रामपंचायतीकडून व संबंधित ग्रामसेवकाकडून त्या कार्यकर्त्यांना उडवा उडवी चे उत्तर सदर सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात आलेले आहे. मात्र हे मित्रत्व प्रेम इतकं उफाळून आलं की सर्व शासनाचे नियम धाब्यावर बसवून चक्क शेतामध्येच नाली बांधकाम करून दिल्याचा प्रकार घडला आहे. मात्र या प्रकरणावर कोणाचंच लक्ष का नाही गेलं असे सुद्धा यावेळी प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या बद्दल काही दिवसांमध्ये ठोस निर्णय घेत सदर गैरप्रकार घडल्याची वाच्यता फोडणार असून सदर ग्रामपंचायतीच्या विरोधामध्ये मुख्यमंत्री पासून तर सर्व स्तरावर तक्रार सुद्धा करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र ही ग्रामपंचायत कोणत्या भागात येते, हे काही दिवसातच आपल्यासमोर येणार असल्याचेही बोलले जात आहे. मित्र प्रेमापोटी नाली बांधकामाचा शेतात झालेला हा प्रकार सध्या चर्चेचा विषय पंचक्रोशीत ठरला आहे.