आमदार चित्राताई वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चा तर्फे बुक वाटप

चंद्रपूर :- चंद्रपूर येथील भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे विधान परिषदेच्या आमदार चित्राताई वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त आज 16 फेब्रुवारी रोजी गांधी चौक येथे गरजू विध्यार्थ्यांना बुकचे वाटप करण्यात आले. गरजू विध्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत व्हावी या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रम हा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या अध्यक्ष सविताताई कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रामुख्याने चंद्रकला सोयम, माया उइके,शीला चव्हाण, जयश्री जुमडे, कल्पना बाबुलकर, संगीता खांडेकर, आशा आबोजवार, सारिका चांदुरकर, मोनिषा महातव, रबिया खान, नूतन मेश्राम, सिंधुताई लेनगुरे, रेखा चन्ने, आदी महिला उपस्थित होत्या.
Post a Comment (0)
Previous Post Next Post