मित्र प्रेमापोटी चक्क ग्रामपंचायतीने शेतामध्ये बांधून दिली नाली

चंद्रपूर:- मित्र म्हणजे एक अतूट नातं आपल्या या समाजामध्ये मानल्या जातात मित्र म्हणजे सर्व काही, मित्र म्हणजे सर्व असंच एक उदाहरण एका ग्रामपंचायतीने दाखवून दिले आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सदर व्यक्ती हा सदस्य म्हणून निवडणूक लढवून तो निवडून आलेला आहे. मात्र आपल्याच एका मित्राला चक्क त्याच्या वावरामध्ये नाली बांधून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार सुद्धा नोंदवली आहे. मात्र त्या ग्रामपंचायतीकडून त्यांना उडवा उडवी चे उत्तर देत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांना कडून माहिती प्राप्त झाली आहे.मात्र या ग्रामपंचायत सदस्याचे मित्रत्व प्रेम इतकं उफाळून आलं की चक्क त्यांनी आपल्याच मित्राच्या वावरामध्ये नाली बांधकाम करून शासनाचे नियम धाब्यावर बसवून चक्क वावरामध्येच नाली बांधकाम करून दिल्याचा प्रकार घडला आहे. मात्र या प्रकरणावर कोणाचंच लक्ष का नाही गेलं असे सुद्धा यावेळी प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र सामाजिक कार्यकर्ता कडून याबद्दल काही दिवसांमध्ये ठोस निर्णय घेत याबद्दल वाच्यता फोडणार असून सदर ग्रामपंचायतीच्या विरोधामध्ये सर्व स्तरावर तक्रार सुद्धा करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र ही ग्रामपंचायत कोणत्या भागात येते, हे काही दिवसात  आपल्या समोर येणार असल्याचेही बोलले जात आहे. मित्र प्रेमापोटी नाली बांधकामाचा वावरात झालेला हा प्रकार सध्या चर्चेचा विषय पंचक्रोशीत ठरला आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post