भामरागड (प्रा कैलास निखाडे):- "वाचन संकल्प महाराष्ट्राचा " या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालय विभाग ग्रंथपाल श्री मोराळे. व्ही .आर यांनी केले दिनांक 30 व 31 डिसेंबर 2024 रोजी या दोन दिवसीय ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. डाखरे सरांनी व डॉ. निखाडे सरांनी केले, डॉ. डाखरे सरांनी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वाचन केले पाहिजे असा संदेश दिला. तर डॉ. निखाडे सरांनी वाचनाचे फायदे विद्यार्थ्यांना पटवून दिले आणि ग्रंथ प्रदर्शन सर्वांसाठी खुले करण्यात आले जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेतला ०१ जानेवारी २०२५ रोजी सामूहिक वाचन हा उपक्रम घेण्यात आला विद्यार्थ्यांना स्वतःच्या आवडीची पुस्तके वाचण्याची संधी मिळाली वाचन केलेल्या पुस्तकाचे परीक्षण कसे करावे याबद्दल ग्रंथपाल मोराळे .व्ही. आर. सरांनी मार्गदर्शन केले कार्यक्रम घेण्यासाठी प्राचार्य डॉ. लाड सरांनी परवानगी दिली तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर घोनमोडे सर , तावेडे सर व सेवक बंडू बोंडे यांनी परिश्रम घेतले.