वेळेच्या नियमाला तिलांजली; राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष? होत असल्याचा आरोप
चंद्रपूर :- शहरात देशी विदेशी वाईन शॉप व बिअर शॉपी दुकान उघडण्याचा वेळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठरवून दिल्या आहेत मात्र शहरातील मद्याची दुकाने वेळी आधीच सुरू होत आहे सकाळीच मध्येचा घोट तळीराम घेत असल्याची चित्र दिसून येत आहे जिल्ह्यात तब्बल सहा वर्षानंतर दारू विक्री सुरू झाली आहे त्यामुळे तळीरामाचा वनवास संपला मुळात परवान धारकांना दारू विक्रीच्या अटी व शर्ती लादून देण्यात आल्या आहेत पण शहरात निर्धारित वेळेआधी सकाळीच काही बिअर बार मधून दारू विक्री सुरू होत असल्याने नियमाचे खुलेआम उल्लंघन होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे मागच्या दरातून तळीरामाची तहान भागिवली जात असताना सुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र याकडे कानाडोळा करीत असल्याने अधिकाऱ्यांच्या भूमिकावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आल्यानंतर तडीरामाची मोठी पंचायत झाली होती त्यांना वाढीव दराने मध्ये विकत घ्यावे लागत होते या भागातील तळीराम ब्लॅक मध्ये दारू घेऊन तहान भागवीत होते एकंदरीत या बंदीत विक्रेते चांगलेच मालामाल झाले होते आता तब्बल सहा वर्षानंतर बंदी उठवण्यात आली आहे त्यामुळे तळीरामांची मोकळा श्वास घेतला आहे जिल्ह्यातील सर्व दुकान सुरू झाले जागोजागी बियर शॉप घेण्यात आल्या शहरातील बिअर बार वाईन शॉपसह देशी दारूचे दुकान सुरू आहे या परवानाधारकांना दारू विक्रीची परवानगी देताना देण्यात आल्या आहे बिअर बार व बियर शॉपी उघडण्यासाठी वेळ निर्धारित केली आहे सकाळी दहा वाजता पासून दारू विक्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहे पण काही बिअर बार परवानाधारकांनी निर्धारित वेळेला ठेंगा दाखवत दारू विक्री सुरू केल्याचे दिसून येत आहे वेळआधीच दारूविक्री सुरू असतानादेखील राज्य उत्पादन शुल्क विभाग दुर्लक्ष करीत आहे काय ? असा प्रश्न चंद्रपूर शहरातील जनतेला पडला आहे