तो रेती माफिया कोण?
चंद्रपूर:- चंद्रपूर येथील एका वाळू तस्कराकडून आपल्याच नेत्यांच्या विषयी आग पाखड केल्याचे प्रत्यक्षात अनुभवास आले असून हा रेतीमाफिया याच नेत्यामुळे आज उच्चांक गाठत असल्याचेही बोलल्या जात आहे. मात्र याची सुरुवातीची स्थिती बघता हा रेती माफिया त्यांच काम पाहत होता. आणि त्याला त्याच नेत्याच्या विरोधात इतकी आग पाकड करण्याचं कारण तरी काय, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. मात्र हा कार्यकर्ता आता सध्याच्या स्थितीमध्ये त्या परिसरामध्ये सर्वात मोठा रेती तस्कर माफिया झाल्याचेही दिसून येत आहे. या रेतीमाफीचा इतका बोलबाला आहे की अधिकारी वर्गासोबत त्यांचे चांगलेच मधुर संबंध असल्याचेही सांगण्यात येत आहे. एका कार्यक्रमांमध्ये मात्र एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यासोबत बसून सुद्धा दिसून आला आहे. परंतु, या रेतीमाफियाने काल आपल्याच नेत्याविरोधात आगपाखड करत शिवीगाळ केल्याचेही सुद्धा दिसून आले. त्यामुळे आश्चर्य वे्यात होत आहे. मात्र या रेती माफियाची एवढं आग होण्याचे कारण अद्यापही काही समजलं नसून मात्र या रेतीमाफियाने त्यांच्याच फळीमध्ये तयार झालेल्या नेत्यांनाही सुद्धा शिवीगाळ केल्याचे प्रत्यक्षात अनुभवास आले आहे. हा रेती माफियाने सध्या स्थितीत मोठमोठ्या अधिकाऱ्यांसोबत चांगले मीठे संबंध निर्माण केल्याने आता मात्र आपल्या ज्या नेत्यांमुळे आपण घडलो त्याच नेत्याची आता हा लक्तरे सर्वांसमोर वेशीवर टांगत असल्याचे दिसून येत आहे. मात्र एक काळ असा होता कि, हाच रेतीमाफिया त्या फळीमध्ये तयार होत होता आणि त्याला चांगला प्रतिसाद देत म्हणून हा नेता त्याला मोठा करत होता आणि याच नेत्याच्या जोरावर आज त्याला जे काही वैभव प्राप्त होत आहे. परंतु त्याच नेत्याच्या विरोधात आता तो असभ्य भाषेत गरळ ओकत असल्याने अश्या अशोभनिय कृती कडे बघता याचा माज कुठेतरी संबंधित बड्या नेत्याने काढायला हवा अशी एकच चर्चा मात्र कालच्या त्याच्या वक्तव्यावरून दिसत आहे. पण त्याला कुठेतरी मात्र यांच्या नेत्यांनी याला तंबी द्यावी असे बोलले जात आहे.