श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव शोभायात्रेचे भाजपातर्फे स्वागत
चंद्रपूर : श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचे जीवन भक्ती मार्गाला समर्पित होते. ज्ञान, निती व अध्यात्म यांच्या माध्यमातुन त्यांनी सत्यशोधक बाणा कायम जपला. असहाय्य जनतेची मदत केली. साधुसेवा करण्यावर भर दिला. त्यांनी दिलेली शिकवण अंगीकार करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन भाजपचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांनी केले.श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जन्मोत्सवानिमीत्त समाजातर्फे चंद्रपूरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने जटपुरा गेट येथे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी राहुल पावडे बोलत होते.श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांचा जयजयकार करणा-या घोषणांनी परिसर निनादुन गेला होता. यावेळी चंद्रपूर भाजप जिल्हाध्यक्ष राहूल पावडे, सुरज पेदुलवार, किरण बुटले, छबुताई वैरागडे, रवी लोणकर, पुरुषोत्तम सहारे,संदीप आगलावे, सचिन कोतपल्लीवार,धनराज कोवे, बी. बी. सिंग, प्रमोद शिरसागर, महेंद्र जुमडे, किशोर आत्राम, चांद सय्यद, संजय निखारे ,रुद्रनारायण तिवारी, महेश जिटे, मधुकर राऊत, रंजीत डवरे, रितेश वर्मा, आकाश मस्की, संदीप सदभैया,आदी भाजपा पदाधिका-यांसह मोठया संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.