सामाजिक भान जपणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व... प्रभाकर आवारी

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील  वृत्तपत्र क्षेत्रातील सर्वांच्या ओळखीचे व्यक्तिमत्व श्री प्रभाकर आवारी संपादक प्रभात गुंजन यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांच्याविषयी थोडसं  लिहिण्याचा प्रपंच करीत आहो.प्रभाकर  आवारी यांचा  जन्म 26 11 1973 रोजी एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात भद्रावती तालुक्यातील राळेगाव या खेड्यात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पाटाळा व वरोरा   आनंद   निकेतन येथे झाले. 1996 97 च्या दरम्यान त्यांनी चंद्रपूर तून आपल्या पत्रकारितेची सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांनी नंदोरी येथे गिट्टी क्रेशर येथे मजूर म्हणून काम केले त्यांच्या कार्याची दखल घेत श्री पत्तीवार यांनी त्यांना   चंद्र धून या वृत्तपत्राची धुरा सोपवली त्यांनी यशस्वीपणे आपल्या कार्याला न्याय दिला. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र साप्ताहिक प्रभात गुंजन या वृत्तपत्राची सुरुवात 2009   पासून  आज पर्यंत यशस्वीपणे सांभाळत आहे. प्रभाकर आवारी  हे एक यशस्वी पत्रकार म्हणून समाजात व जिल्ह्यात नावारूपास आलेले आहे. याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.सन 2001 पासून श्री गुरुदेव सेवा मंडळ व राष्ट्रसंत साहित्य परिषद चे अधिकृत सदस्य होऊन श्री गुरुदेव सेवा मंडळाचे कार्य अविरतपणे ते सांभाळत आहे. अनेक गावात त्यांनी श्री गुरुदेव सेवा मंडळाची शाखा स्थापन करण्याचे कार्य केलेले आहे. त्यांच्या या कार्याची पावती म्हणून 2007  ला त्यांना चैतन्य युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री बंडोपंत बोडेकर यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी तुळशिनगर येथे त्यांनी मंडळाची स्थापना सुद्धा केलेली आहे.  गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात प्रियदर्शनी या श्री गुरुदेव सेवा मंडळाची शाखा सुद्धा त्यांनी स्थापन करून आदिवासीबहुल भागात सेवा मंडळाचे कार्य जोमाने चालू हावे याकरिता सुद्धा प्रयत्न केले आहे. अशा या महान व्यक्ती महत्वाला......... अनंत कोटी सुभेचछा
Post a Comment (0)
Previous Post Next Post