या दुष्कृत्याबाबत महिलांनी व्यक्त केला संताप
चंद्रपूर:- कोरपणा येथील एका शाळेतील मुलीवर शिक्षकाकडूनच लैंगिक अत्याचार झाल्याचे पडसाद चंद्रपुरातही उमटले. आज शनिवार सायंकाळी ७.३० वाजता या घटनेच्या तीव्र निषेध व्यक्त करत भारतीय जनता पार्टी तर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला आहे. या निषेध मोर्चात आरोपी शिक्षकावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि तातडीने शिक्षा देण्यात यावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली. या निषेध मोर्चा त नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला हा मशाल मोर्चा शहरातील गांधी चौक चंद्रपूर महानगरपालिका येथे करण्यात आला यावेळी मोर्चेकरांनी आरोपी विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.आरोपीला कायद्यानुसार कडक कारवाई करावी या मागणीचे फलक नागरिकांनी हातात घेतले होते. महिलांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होत आरोपीवर कारवाई व्हावी याबाबत मागणी करत संताप व्यक्त केला. यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्ष राहुल पावडे, प्रमोद कडू, ब्रिजभूषण पाझारे,भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्ष सविता कांबळे, किरण बुटले, शिला चव्हाण संगीता खांडेकर, शितल आत्राम, माया उईके, रेणू घोडेस्वार, मनीषा महातव, संतोषवार,प्रज्वल कडू, विवेकी बोंडे नामदेवराव डाहुले, अनिल फुलझले,संदिप आगलावे, पुरुषोत्तम सहारे,सचिन कोतपल्लीवार, दिनकर सोमलकर, चाद सय्यद, धम्मप्रकाश भस्मे,तुषार सोम, आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.