मराठी विषय शिक्षकाच्या पाठीशी महासंघ उभा राहील : डॉ. हेलवटे

चंद्रपूर :- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई तर्फे  इयत्ता बारावीपर्यंत  मराठी विषय सक्तीचा करण्याबाबतचा अध्यादेश नुकताच निघाला, याचे श्रेय   कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाला जाते. मराठी भाषा ही दर्जेदार असल्याने राजभाषा असून तिला  अभिजात भाषेचा दर्जा दिला जावा. त्यासाठी मराठी साहित्याची निर्मिती  होणे आवश्यक आहे.  मराठी विषय शिक्षकानेही मराठी भाषा विषयाच्या संगोपन व संवर्धनासाठी प्रयत्न करून साहित्याची निर्मिती करावी, त्यासाठी येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी महासंघ भक्कमपणे आपल्या पाठीशी उभा राहील, असे आवाहन राज्य सल्लागार डॉक्टर विजय हेलवटे  यांनी पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालय  येथे   नुकत्याच झालेल्या एकदिवसीय राज्यस्तरीय प्रतिनिधी शिबिरात  सत्कारप्रसंगी व्यक्त केले.सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मराठी साहित्य विद्यापीठ अमरावती रिद्धपूरचे प्रथम कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर उपस्थित होते.  प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणेचे सचिव सुधीर भोसले, महासंघाचे अध्यक्ष प्रा. सुनिल डिसले, सचिव बाळासाहेब माने, डॉ. ज्ञानेश हटवार, डॉ. मनिषा रिठे, डॉ. प्रतिभा विश्वास, प्रा. संजय लेनगुरे, डॉ. पांडुरंग कंद यांच्यासह महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यातील जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते.  यावेळी मराठी विषय शिक्षकांच्या समस्या, अडचणी, विद्यार्थ्यांमध्ये मराठी विषयात रुची वाढविण्यासाठी घटकांनुसार अध्यापन कौशल्यातील बदल आदींवर चर्चा करण्यात आली.
Post a Comment (0)
Previous Post Next Post