लोकांना सार्वजनिक मंदिर बांधून दिलें आणि केला देहदानाचा संकल्प

चंद्रपूर :- एका सातवी पर्यन्त शिकलेल्या सामान्य माणसाने आधी भूमी दान करुन स्वखर्चाने लोकांना सार्वजनिक मंदिर बांधून दिलें आणि शनिवारी (दि. १४ सप्टेंबर) पत्नीसह मरणोत्तर देह दानाचा संकल्प केला. हरिदास जितेंद्र बिस्वास आणि श्रीती हरिदास विश्वास असे या दांपत्याचे नाव आहे. त्यांच्यासह बिणा विष्णू बिस्वास यांनीही आपले संकल्प पत्र सुपूर्द केलें.बंगाली कॅम्प येथील त्यांनीच बांधून दिलेल्या सार्वजनिक शिव मंदिर सभागृहात हा छोटेखानी संकल्प सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीर रचना शास्त्र विभागाचे डॉ. चांदेकर, समुपदेशक झलके, आयएमए चे डॉ. अंमल पोद्दार, मनोरमा हेल्थ केअर ट्रस्ट चे समाजसेवी डॉ. वैभव पोडचलवार, देहदान कार्यकर्ता किशोर सरकार, डॉ. विधान बिस्वास, विष्णू जितेंद्र बिस्वास, नरेंद्र बैरागी, बिनोय बैरागी आणि पत्रकार मुकेश वाळके हे उपस्थित होते.डॉ. चांदेकर यांनी यावेळी संकल्प पत्राचा स्वीकार करत सांगितले की, देहदानात चंद्रपूर विदर्भात अव्वल आहे. हरिदास बिस्वास सारखी सामान्य माणसं या क्षेत्रासाठी अत्यंत प्रेरणादायक ठरतात. त्यांनीं आपल्या समाजापुढेच नव्हें जिल्हयात आदर्श निर्माण केला आहे. डॉ. पोद्दार यांनी हे पुण्यकर्म असुन यावर जनजागृती होण्याची गरज सांगितली. ज्येष्ठ देहदान कार्यकर्ते प्रदीप अडकिने यांनी आपल्या शुभेच्छा पाठवून प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाला अनेक नागरीक विशेषतः महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Post a Comment (0)
Previous Post Next Post