जिल्हा पातळी योगासन स्पर्धेत 11 विध्यार्थ्यानी मारली बाजी

चंद्रपूर :-  चंद्रपूर मनपा स्तरीय जिल्हा पातळीवारील योगासन स्पर्धा न्यू इंडिया कॉन्व्हेंट चंद्रपूर चे भव्य प्रांगणात नुकतीच दि. 4 सप्टेंबर 2024 ला  या संस्थेच्या शिक्षिका शुभांगी डोंगरवार जेष्ठ योग शिक्षिका यांचे कुशल नेतृत्वात पर पडली. स्पर्धेचे उदघाटन मा. श्री. मनोज पंधराम तालुका क्रीडा अधिकारी जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर यांचे शुभ हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक मा. श्री धीर सर तसेच धीर म्याडम तसेच प्राचार्या मा. वैशाली जेणेकर म्याडम यांची उपस्तिती व उच्च मार्गदर्शन लाभले.स्पर्धेच्या निकालाची आणि माहिती संकलनाची चोख जबाबदारी मधुकर राजूरकर जिल्हा सह प्रभारी भारत स्वाभिमान, अरुणा शिरभैय्या योग शिक्षिका, पुष्पा तपासे योग शिक्षिका, अरुणा कापटे योग शिक्षिका यांनी उत्तम रित्या पार पाडली. पंच म्हणून शुभांगी डोंगरवार योग शिक्षिका, किशोर कहारे, अशोक साळवे, अशोक पूर्णये, प्रथम डोलसलवार यांनी जबाबदारी पार पाडली.मा. मनोज पंधराम तालुका क्रीडा अधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आजच्या विध्यार्थ्यास शालेय शिक्षणा सोबतच योग प्राणायामची जोड असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. या स्पर्धेत विविध शाळेच्या बहुसंख्य विध्यार्थ्यानी आपला सहभाग नोंदविला असून न्यू इंडिया कॉन्व्हेंट च्या 11 विध्यार्थ्यानी बाजी मारली. स्पर्धेची संपूर्ण धुरा अतिशय उत्तम रित्या सांभाळल्या बद्दल शुभांगी डोंगरवार यांचे तसेच स्पर्धेत बाजी मारणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा देण्यात आल्या. स्पर्धेचे प्रस्ताविक, संचालन आणि समारोप शुभांगी डोंगरवार योग शिक्षिका यांनी केले.
Post a Comment (0)
Previous Post Next Post