चंद्रपूर शहरातील उडिया मोहल्ला येथे सख्ख्या भावाची हत्या

पोलिसांनी आरोपी मंगल गेडाम याला केली अटक 
चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मागील भागात असलेल्या उडिया मोहल्ला येथे गणेश गेडाम हा घरी जेवण करीत होता. त्यावेळी त्याचा भाऊ मंगल पुंडलिक गेडाम घरी आला.  मंगल हा दारू च्या नशेत होता, त्याने भावाला शिवीगाळ करीत वाद सुरु केला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्याने कु-हाडीने गणेशच्या गळा व डोक्यावर वार केला. या हल्ल्यात गणेश जमिनीवर कोसळला. रक्तबंबाळ अवस्थेत वार्डातील रहिवाश्यांनी गणेशला रुग्णालयात नेत असताना वाटेत गणेश यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ आरोपी मंगल गेडामला अटक केली. उत्तरीय तपासणीसाठी गणेशचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post