घुग्घुस - : येथील नगरपालिका मुख्याधिकारी यांना मुख्य मार्गापासून ते जनता शाळेपर्यंत जाणारा रोड उंच करून रुंदीकरण करण्याबाबतचे निवेदन कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी प्राचार्य यांच्या स्वाक्षरीचे प्रशासकीय अधिकारी निलेश तुराणकर यांना नुकतेच दिले. यावेळी यावेळी प्रा. नामदेव मोरे, प्रा. अरविंद आसुटकर, प्रा. संतोष सूर, प्रा. सचिन भोयर, प्रा. ईश्वर खंगार, प्रा. विशाल नगराळे, प्रा. धनपाल पिंपळकर, प्रा. नरेश बुच्चे, प्रा. प्रदीप वासाडे उपस्थित होते. निवेदनात मुख्य मार्ग जनता शाळा वळणापासून ते शाळा प्रवेशद्वारापर्यंतचा मार्ग हा खूप वर्षीपूर्वी केला आहे. सदर मार्गावरून विद्यार्थ्यांना ये-जा करावे लागतात. आज या मार्गावर बरेच घरे झालेले आहेत. त्यामुळे वाहतुक पण वाढलेली आहे. सदर मार्ग पूर्ण खाली दबून केल्यामुळे रोडची दयनीय अवस्था झाली आहे. मार्गावर सतत पाणी साचून राहते. याशिवाय अनेक नागरिकांनी आपल्या घरासमोर अतिक्रमण केल्यामुळे विद्यार्थी तसेच चारचाकी वाहनांना ये-जा करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. मार्गावर घाणीचे प्रचंड साम्राज्य प्रचंड वाढलेले आहे. मार्गावरील चुकीच्या पद्धतीने बनविलेले Speed Braker व मार्गावरील काटेयुक्त झाडे अपघाताला आमंत्रण देणारे ठरले आहे. सदर मार्ग म्हणजे अपघाताला निमंत्रण देणारा तर आरोग्याच्या दृष्टीने अनेक रोगांचे साम्राज्य ठरणारा ठरत आहे. सदर मार्ग विद्यार्थी व नागरिक हिताच्या दृष्टीने योग्य असल्याने न्याय्य मागणीची पूर्तता त्वरित करावी असे आवाहन पालक-शिक्षक-विद्यार्थी करीत आहे.