धनोजे कुणबी मध्यवती समिती तर्फे खासदार यांचा सत्कार

चंद्रपूर : -- धनोजे कुणबी मध्यवर्ती समिती पुरस्कृत व धनोजे  कुणबी समाज मंदिर, लक्ष्मीनगर वडगाव द्वारा आयोजित खासदार प्रतिभा धानोरकर यांचा भव्य सत्कार नुकताच स्व. मा. सां कन्नमवार सभागृहात पार पडला.  यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष धनोजे कुणबी मध्यवर्ती समितीचे अँड. पुरुषोत्तम सातपुते तर उद्घाटक राजुरा येथील समाज मंडळाचे प्रा. दौलतराव भोंगळे होते. प्रमुख अतिथी  म्हणून नागपूर येथील समाज मंडळाचे अध्यक्ष मधुकर ढोके, यवतमाळचे अँड. संतोष कुचनकर, सौन्सरचे अध्यक्ष युवराज वासाडे, गडचांदूर येथील पवन राजुरकर, वरोरा अ्ँड. गजानन बोथले, वणीचे राजेश पहापळे, बल्लारपूर येथील डॉ. पांडुरंग जरीले, चंद्रपूरचे सचिव अतुल देऊळकर, कोषाध्यक्ष विनोद पिंपळशेंडे, भद्रावतीचे अध्यक्ष पांडुरंग टोंगे कोरपणाचे सुनिल देरकर, घाटंजीचे प्रदीप राजुरकर उपस्थित होते.यावेळी खासदार यांनी आपल्या भाषणात  आपण लोकसभा निवडणुकीत मताधिक्याने निवडून येण्यात समाज मंडळांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याने ज्या ठिकाणी समाज मंदिर नाही तेथे समाज मंदिर उभारून देण्याचे आवाहन केले. शिवाय आपल्या समाजाचा विद्यार्थी इतर समाजाच्या तुलनेने मागे कसा आहे, यावर प्रकाश टाकला.अध्यक्षीय भाषणात अँड. सातपुते यांनी  सद्यःस्थितीत समाजातील लोकप्रतिनिधी निवडून येणे आवश्यक असल्याचे मत मांडले. यासाठी समाजातील बांधवांनी जागृत होऊन मतदान करणे काळाची गरज असल्याचे मत मांडले. अध्यक्षीय भाषणात प्रा. भोंगळे यांनी समाजातील विद्यार्थ्यांना वाचनालय उपलब्ध करून देणे, हा समाज मंडळाचा उपक्रम असायला हवा असे मत मांडले. वाचनाअभावी विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे संचालन धनोजे कुणबी समाज मंदिराचे सहसचिव प्रा. नामदेव मोरे, प्रास्ताविक पवन राजुरकर तर आभारप्रदर्शन  अँड. विलास माथनकर  यांनी केले. कार्यक्रमाला समाजातील गणमान्य बांधव उपस्थित होते.
Post a Comment (0)
Previous Post Next Post