भामरागड :- राजे धर्मराव हायस्कूल तथा क. महाविद्यालय भामरागड येते पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या वृक्षाला राखी बांधून मानव व वृक्षाचे निसर्गप्रेम आणि आपुलकी जोपसणाऱ्या संस्कृतीचे महत्व रक्षाबंधनाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न शाळेच्यावतीने करण्यात आला.यावेळी उपस्थित विदयालायचे मुख्याध्यापक श्री. हकीम सर, खंडारकर सर, गावडे सर, झलके मॅडम, चालूरकर सर, घोडे सर, खर्चे बाबू कर्मचारी तसेच मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी झाडे लावा झाडे जगवा ही शपथ घेऊन झाडांचे संवर्धन व जोपासना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.