भामरागड राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा

भामरागड (प्रा.कैलास निखाडे): - राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालय भामरागड येथे शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या प्रा विशाल सुरेंद्र तावेडे यांनी विद्यार्थ्यांन साठी वेग वेगळा खेळांचा आयोजन केला.याप्रसंगी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हेमराज जी. लाड यांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आणि तेंचा खेळा बद्दल आत्मा विश्वास वाढवला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. चालुरकर यांनी विस्तारित ध्यानचंद जी बद्दल माहीत दिली, प्रा.डॉ संतोष डाखरे यांनी खेळान माधी रुची कशी निर्माण करायची त्या बद्दल मार्गदर्शन केलं, प्रा.डॉ प्रमोद घोनमोडे यांनी माणूस अथक परिश्रमानी सोतः ला कस घडऊ शकत त्या बद्दल मार्गदर्शन केलं, प्रा.डॉ सुरेश डोहाने यांनी अभ्यासा सोबत खेळ पण तितकाच महत्वाचा आहे है मुलांना सांगितलं. प्रा.डॉ कैलास निखाडे यांनी खेडा च्या माध्यमातून विध्यार्थी कस करीअर करू शकता या बद्दल मागदर्शन केलं. प्रा विनायक मोराळे यांनी '३ एच' - (हांड, हार्ट, हार्डवर्क)  च्या मदितीने संघर्षाला कस आत्मसात करायचा मागदर्शन केलं.कार्यक्रमाचे संचालक प्रा. विशाल सुरेंद्र तावेडे यांनी खेळ खेळण्या चे फायदे सांगितले आणि खेळामुळे व्यक्तीचे व्यक्तिमत्व अनेक प्रकारे विकसित होण्यास कसे मदत करतात या बद्दल मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाचे संचालन B.A तृतीय वर्ष चे छात्र ममता भांडेकर आणि स्वप्निल कूरुस्वामी तर आभार प्रदर्शन किरण कुरुस्वामी यांनी मानले l कार्यक्रम यशस्वी करण्यांसाठी श्री. बंडू बोन्डे  यांनी मदत केली.
Post a Comment (0)
Previous Post Next Post