चंद्रपूर : - ब्राम्हण सभा, चंद्रपुर तर्फे दरवर्षी गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम आयोजित केल्या जातो. यावर्षी देखील या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. इयत्ता दहावी, बारावी, पदवी, अभियांत्रिकी, वैद्यकीय, मधील प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. सोबतच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा देखील सत्कार होणार आहे.सदर कार्यक्रम स्थानिक लोकमान्य टिळक विद्यालय, जिल्हा स्टेडियम जवळ येथे दिनांक १ सप्टेंबर रोज रविवारला होणार आहे. तरी अधिक माहितीकरिता ब्राम्हण समाजातील विद्यार्थ्यांनी ब्राम्हण सभेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश धानोरकर तसेच चंद्रपुर गडचिरोली जिल्हा ब्राह्मण सभेच्या इतर पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.