पटवारी आणि दलालाच्या मालमत्तेची चाैकशी व्हायला हवी.?

 
चंद्रपुर :- येथील येणार्या क्षेत्रात प्लाट, शेती, खरेदी विक्री करून देणारे अनेक दलाल माेठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. आता तर दलालाची संख्या जिल्ह्यात पुर्वी पेक्षा ही झपाट्यानी वाढली आहे. आधी बेराेजगार असणारे पुरूषच रियल ईस्टेटची दलाली करायचे. परंतु या व्यवसायात आता महिला सुध्दा दिसुन येतात. ज्या  दलाल वर्गाकडे आधी स्वताची साधी दुचाकी गाडी नव्हती. ताे दलाल आता गाडी, बंगल्यावर आला आहे. त्याचे मुख्य कारण म्हनजे पुर्वीचे दलाल माेजक्या एक ते दाेन टक्यावर काम करायचा.मात्र आताचा दलाल माेठा ( स्वताकरिता जाेंदरा काढत ) गाला जमवण्यात मुस्तेद झाला आहे. ज्यांना दलाली बद्दल काळी मात्र माहिती सुध्दा नाही ताे ही आता स्वताला अनुभवी दलाल समजु लागला आहे. ऐवढेच नव्हे तर या दलाली पेश्यात शासकिय, निमशासकिय नाेैकरी करणारे पण दलाली करण्यात व्यस्त आहेत. अश्या काही दलालाची माहिती घेतल्यास जे आधिचे दलाल हाेते. ते आता ले- आऊट धारक तसेच लाखाे कराेडाेची शेती घेणारे व्यापारी झाले असुन ते असे झाले कसे हा संशाेधनाचा विषय ठरू शकताे. त्याचे मुख्य कारण म्हनजे विस ते पंचविस वर्षा पुर्वी प्लाट, शेती खरेदी विक्रीला तेवढे फार से महत्व नव्हते. कालांतराने चंद्रपुर शहरातली लाेक संख्या झपाट्याने वाढत गेली. त्यामुळे शहरालगतची जागा अपुरी पडली. आता तर शहराच्या आजुबाला जागाच शिल्लक नसल्याने, शहरातल्या जागेचे भाव गगनाला भिडले आहेत. शहरात आता प्लाट घेण्यास लाखाे रूपये माेजावे लागतात. प्लाट घेवुन त्यावर घर बांधने म्हनडे कराेडाे रूपयाचे इंव्हेसट करने हाेय. काही ग्राहक वर्ग ( सदनिका ) फ्लेट घेण्याकडे वळलेला आहे.  म्हनुन शहरात फ्लेट विकणार्या बिल्डर लॉबीचा व्यवसाय फलतांना दिसुन येताे. आधी शहराच्या जवळ पास शेती करतांना शेतकरी दिसुन येत हाेता. परंतु शहरातल्या जवळ पास आता शेत्या शिल्लक राहिल्या नसुन जेम तेम असणार्या शेतीचे दाम कराेडाेचा घरात गेले आहेत. शेती आता कास्तकारांची राहीली नाही. कारण त्या शेतीच्या जागेवर रहवासी ले - आऊट पाडत त्या शेत्या रिइल ईस्टेट व्यापार्यांनी घेवुन त्यावर प्लाट टाकुन  माेठ्या रक्केमेत विकण्यात येत आहे.        असाे पण काही वर्षात चंद्रपुरातील प्लाट धारकांच्या चुकी मुळेच दलाल आणि पटवारी यांच्या संगमताने गैर प्रकार झाला असल्याची बाब समाेर येत आहे. अनेक प्लाटचा सातबारा पटवारी, तलाठी कार्यालयाशी संग्लित असताे. ज्या सातबारा नामधारकाने तलाठी कार्यालयातिल टेक्स सलग विस ते पंधरा वर्षा पासुन भरलाच नाही. अश्या प्लाट धारकांच्या वारसधारांना आपल्या आई वडिलाने प्लाट घेवुन ठेवले असावे याची माहिती वारसदारांना ही नसते. याची कागदाेपत्री माहिती पटवारींनाच असते ती माहीती पटवारी जवळच्या दलाला देवुन अश्या प्लाटधारकांचे प्लाटच पटवारी यांचाशी संगमत करून चंद्रपुर येथिल काही दलाल तसेच पटवारी यांनी मिळुन जाली दस्तावेज तयार करत प्लाटधारकांच्या जागी दुसर्यांनाच उभे करित दुय्यम निबंधक कार्यालयातुन अनेक रजिस्ट्री करत खरेदी विक्री केल्याची धक्कादायक बाब समाेर येत आहे.यात हे दलाल कास्तकारांन बराेबर विसार पत्र करित स्वताची वरिल रक्कम गाला जमवुन माेठ्या रियल ईस्टेट व्यापार्यांना विकल्या आहेत. शहरालगतचा अनेक शेत्या दलाला व पटवारी यांनी आपल्या स्वारथापाेटी व्यापार्यांचा घशात टाकल्या व मालामाल झालेत. असे अनेक प्रकार चंद्रपुर येथिल देवाळा, दाताळा, काेसारा तसेच अनेक सांझात घडले. हा सर्व प्रकार घडत असतांना तलाठी चे दुर्लक्ष का बर झाले? तसेच दुय्यम निबंधक अधिकारी ह्यानी सहानिशा का केली नाही? असे गंभीर आराेप यांचावर हाेत असुन सुध्दा जिल्हाधिकारी अश्या गंभीर विषयाकडे स्वताहुन लक्ष का देत नाहीत? याबाबीकडे काना डाेळा का करत असतात? हे न समजण्या पलीकडचे आहे. हि संपु्ण माहिती काही प्लाट धारकांनी व काही दलालानीच न्युज ब्लास्टच्या प्रतीनीधीकडे दिलेली आहे. या सर्व बाबीत माेठा गेैर प्रकार झाला असुन यात शामिल असलेल्या पटवारी, तलाठी, मंडळअधिकारी आणि अल्प कालावधीतच धनकुबेर जमाकरून मालामाल झालेल्या दलालाच्या मालमत्तेची सुध्दा सखाेल चाैकशी व्हावी अशी मागणी धाेकाधडी झालेल्या नागरिरांकडुन केली जात आहे.                       याबद्दल लवकरच याची जिल्हाधिकारी यांच्याकडे दस्तावेजाच्या पुराव्या सहित तक्रार करण्यात येणार आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post