सामाजिक जाणीवेतून विदयार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

चंद्रपूर :- राज्यश्री शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिवस  म्हणून  जिल्हा परिषद शाळा, मांगली येथे साजरा  करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक धनोजे कुणबी समाज मंडळ, चंद्रपूरचे  अध्यक्ष  ऍड. पुरुषोत्तम सातपुते यांनी सामाजिक जाणीवेतून वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला विदयार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले. त्यांनी  राज्यश्री शाहू महाराज यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकताना विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांचा आदर्श घ्यावा, शाहू महाराजांनी विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण तसेच वसतिगृह असण्यावर त्यांचा कटाक्ष होता.  विद्यार्थ्यांनी शाहू महाराज यांचे स्वप्न साकार करण्यासाठी चांगले शिक्षण घेऊन आयुष्यात यशस्वी व्हा व ज्या समाजात आपला जन्म झाला त्या समाजाच्या उद्धारासाठी समोर या,  असे प्रतिपादन केले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते धनराज आस्वले, अँड. जयश्री सातपुते, सरपंच धनराज पायघन, शाळा समिती अध्यक्ष सुनील तेलंग, उपसरपंच ज्योती झिलपे, विनोद पिंपळशेंडे, अरुण मालेकर, मुख्याध्यापक माथनकर, ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. अनिल डहाके, महासचिव अँड. विलास माथनकर, अँड. लीना सातपुते, अजय बोंडे, मंगेश ढेंगळे, प्रशांत काळे , शोभाताई पायघन, घनश्याम उताणे, मधुकर खंगार, नीलिमा वानखेडे,मंदाकिनी दुपारे, ममता जीवतोड, खुशबू  तसेच शिक्षकवर्ग, गावकरी व  विदयार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक माथनकर तर संचालन अजय बोंडे यांनी केले.
Post a Comment (0)
Previous Post Next Post