ओबीसीतील घुसखोरी खपवून घेणार नाही : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे

धर्मानुसार आरक्षणाला ओबीसी संघटनांचा विरोध
चंद्रपूर : - वारंवार ओबीसी संवर्गातून इतर सधन जाती आरक्षण मागत आहेत. देशातील विविध राज्यात राज्य सरकार मतांचे राजकारण करण्यासाठी धर्माच्या आधारावर सधन जातींना घटनाबाह्यरीत्या ओबीसीत सामावून घेत आहेत. हा खूप मोठा घोटाळा आहे. महाराष्ट्रात मराठा समाज ओबीसीतून आरक्षण मागत आहे. पं. बंगाल, कर्नाटक व इतर राज्यात धर्मानुसार आरक्षण दिल्या जात आहे. ओबीसीतील ही अवैध घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही, ओबीसीतून आरक्षण देताना त्या जातीचे मागासलेपण तपासून बघितले पाहिजे, असे विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यावेळी संवाद कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलले.
Post a Comment (0)
Previous Post Next Post