छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य रक्षणार्थ आयुष्य समर्पित केले : राहुल पावडे

ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कार्यालयामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी
चंद्रपूर :छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य रक्षणार्थ आयुष्य समर्पित केले. आजही त्यांच्या शौर्याच्या कहाण्या वाचायला, ऐकायला मिळतात. संभाजींना लहानपणापासूनच राजकारणाची जाण होती आणि त्यांनी अनेक प्रसंगी आपले कौशल्य दाखवले. यांच्या महान जीवन चरित्र पासून युवकांनी प्रेरणा घेऊन आपले जीवन घडवावे, असे प्रतिपादन भाजप महानगराध्यक्ष राहुल पावडे यांनी केले.स्थानिक गिरनार चौक येथील नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महानगराध्यक्ष राहूल पावडे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी जयघोष करीत अभिवादन केले. या कार्यक्रमाला राजु गोलीवार, शिलाताई चव्हाण, दशरथ सिंग ठाकूर, पुरुषोत्तम सहारे, रवी लोणकर, दिनकर सोमलकर, रवी चहारे, विनोद शेरकी, राजेंद्र खांडेकर, विठ्ठल डुकरे, डॉ. गिरधर येडे, रुद्रनारायण तिवारी,मधुकर राऊत, प्रलय सरकार, चांद सय्यद, रामकुमार आकापेली, बाळू कोलनकर, सूर्यकांत कुचनकर, अनिल अडूर,भानेश चिलमिल, राहुल कांमळे, महेश राऊत, अमोल मते, आदींची उपस्थिती होती.
Post a Comment (0)
Previous Post Next Post