ब्राह्मण सभेच्या वतीने स्वामी विवेकानंद व जिजामाता जयंती उत्साहात साजरी करण्यात आली*



 चंद्रपूर :- स्थानिक चंद्रपूर येथील कार्यालयात स्वामी विवेकानंद व माता जिजाबाई याच्या जयंती निमित्त  त्यांच्या प्रतिमेला  विनम्र अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश धानोरकर यांनी स्वामी विवेकानंद हे नव्या पिढीला सकारात्मक दिशा दाखविणारे आहेत त्यांचा आदर्श बाळगून कुठल्याही क्षेत्रात प्रगती करू शकतो,ध्यान,मन,प्रेरणा,सेवा अशा सूत्रांनी जगाला नवीन ओळख निर्माण करून दिली आहेत तर जिजाबाई नी आई ही प्रथम शिक्षिका आहे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहेत त्यांच्या जयंती प्रित्यर्थ नवीन संकल्प करावा असे त्यांनी आपले मत मांडले प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विधितज्ञ सुनील पुराणकर यांनी सुद्धा त्यांच्या जीवनावर व्याख्यान दिले, तसेच प्रशांत जोशी  ,सचिन सांबरे, मंगेश देशमुख, पुरोहित मारोती महाराज,सुनील मंगरुळकर,सौ माणिक मंगरुळकर,सौ.रोहिणी पुराणकर तथा मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन प्रा. महेश यार्दी यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.शरयू मैत्र यांनी मानले.
Post a Comment (0)
Previous Post Next Post