राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या राज्य सचिवपदी चंद्रपुरचे निलेश ठाकरे यांची निवड*



चंद्रपूर:- मालेगाव, नाशिक येथे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा ६ वे अधिवेशन पार पडले. यात २०२३ च्या राज्याची कार्यकारिणी घोषीत करण्यात आली. त्यात चंद्रपुरचे निलेश प्रभाकर ठाकरे यांची राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा महाराष्ट्र राज्य सचिवपदी निवड करण्यात आलेली आहे.
यापूर्वी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या स्थापनेनंतर चंद्रपुर जिल्ह्याच्या जिल्हा प्रभारी म्हणून त्यांनी संघाकरिता आपले अमूल्य योगदान देवून जिल्ह्यात संघ वाढविण्याचा प्रयत्न केला. निलेश ठाकरे यांची कार्यकुशलता बघून पुरोगामी पत्रकार संघाच्या विदर्भ अध्यक्षांनी निलेश ठाकरे यांच्यावर विदर्भ संघटक म्हणून जबाबदारी दिली.विदर्भ संघटक पद भूषविताना निलेश ठाकरे यांनी गोंदिया, भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ व चंद्रपूर या विदर्भातल्या सात जिल्ह्यात जिल्हा कार्यकारीणी गठीत करून संपूर्ण विदर्भात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा विस्तार केला.
मागील सहा वर्षांपासून निलेश ठाकरे हे संघासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य कोर कमिटीमध्ये सुद्धा त्यांना स्थान देण्यात आले. संस्थापक अध्यक्ष मा. विजय सुर्यवंशी, विदर्भ अध्यक्ष तथा पुरोगामी साहित्य संसदचे राज्याध्यक्ष मा. नरेंद्र सोनारकर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष-संतोष जाधव, कार्याध्यक्ष रोडे सर यांनी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी निलेश ठाकरे यांची निवड केली. संपूर्ण विदर्भातील राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा पदाधिकारी, सदस्यांनी त्यांचे  अभिनंदन केले आहे.
Post a Comment (0)
Previous Post Next Post