किड्स… प्लॅनेट पब्लिक स्कूलमध्ये सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी



चंद्रपूर :- सुमन पल्टिपर्पज सोसायटी द्वारा संचालित किड्सॅ प्लॅनेट पब्लिक स्कूलमध्ये, तुलसीनगर चंद्रपूर येथे स्त्री शिक्षणाचा पाया रचणा-या स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रातीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाला स्कूलचे सचिव राजेश वेले यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर मार्गदर्शन केले. स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रिया गिरडकर यांनी सावित्रीबाईंनी महिला व मुलींच्या शिक्षणासाठी किती मोठा संघर्ष केला आणि स्त्रीयांना शिक्षणाची दारे खुली करून दिली यावर माहिती दिली.यावेळी झिविका मुंजेवार, नायरा भोस्कर व दिव्यांशी सत्रे या विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंची वेशभूषा सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका योगीता यांनी सहकार्य केले. संचालन स्नेहल मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन रिता मॅडम यांनी केले.
Post a Comment (0)
Previous Post Next Post