किड्स… प्लॅनेट पब्लिक स्कूलमध्ये ख्रिसमस डे उत्साहात



चंद्रपूर:- सुमन मल्टिपर्पज सोसायटी द्वारा संचालित किड्सत प्लॅनेट पब्लिक स्कूलमध्ये ख्रिसमस डे उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी किड्सु प्लॅनेट पब्लिक स्कूलचे सचिव राजेश वेले सर यांनी विद्यार्थ्यांना प्रेम, विश्वास, त्यागाचे महत्व समजावून सांगितले. स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रिया गिरडकर यांनी मुलांना कहाणीच्या माध्यमातून सांताक्लाज बाबत छान छान गोष्टी सांगितल्या. कार्यक्रमाला विशेष अतिथी जॉन्सन स्टेफन्सस यांनी येशू ख्रिस्त यांच्या जीवनीवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व ख्रिसमस डे संपूर्ण विश्वात उत्साहात का साजरा केला जातो, याबाबत माहिती दिली. शेवटी विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. तसेच मुलांना केले व मिठाईचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्कूलमधील शिक्षिका यांचे सहकार्य लाभले. संचालन रिता मॅडम व आभार स्नेहल मॅडम यांनी केले.
Post a Comment (0)
Previous Post Next Post